ग्राहकांकडून विचारले जाणारे प्रश्न
|
|
प्र. मला बँकेत खाते उघडण्याची आवश्यकता आहे. माझ्यासाठी कोणते खाते सर्वोत्तम आहे?
|
|
उ. वेळोवेळी पैसे जमा करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी बचत खाते उपयुक्त आहे आणि पासबुक हे ओळख / पत्ता पुरावा करीता
उपयोगी ठरू शकतात.तथापि आपणास कधी कधी काही निधी बाजूला ठेवणे आवश्यक असते, मुदत ठेवीने आपण चांगले व्याज कमवू शकाल. दरमहा
आवश्यक असल्यास मासिक उत्पन्न योजना निवडा. आवर्ती ठेव नियमित दरमहा
बचतीसाठी उत्तम आहेत.किंवा पिग्मी ठेव नियमित दररोज बचतीसाठी उत्तम आहेत.
|
|
प्र. गृहकर्जा अंतर्गत असा पर्याय आहे का जेथे मी सुरुवातीच्या वर्षांमध्ये लहान इ.एम.आय.भरू शकतो आणि हळूहळू इ.एम.आय मुल्य वाढवू शकतो?
|
|
उ. होय.गृहकर्जामध्ये परतफेडीच्या परिवर्तनशील पद्धती आहे.जे आपल्याला सुरुवातीच्या वर्षांमध्ये लहान इ.एम.आय.भरून नंतरच्या वर्षांमध्ये मुल्य वाढवण्याचा पर्याय देतो.
|
प्र. मला जुने वाहन खरेदी करण्यसाठी कर्ज मिळू शकते का? परतफेड कालावधी आणि कमाल रक्कम किती आहे?
|
|
उ. होय. आपणास जास्तीत जास्त ३ वर्षे जुने असलेले वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज मिळू शकते. जुन्या वाहनासाठी परतफेड कालावधी कमाल ३६ हफ्ते पर्यंतचा असून कमाल रक्कम
मुल्यांकन रक्कमेच्या ५०% मिळू शकेल.
|
प्र. मला घर बांधणी साठी कर्ज हवे असल्यास आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असल्यास आणखी कोणती सुरक्षितता आवश्यक आहे.
|
|
उ. जर खरेदीसाठी प्रस्तावित घर / फ्लॅट ची निर्मिती होण्याचे बाकी असेल अथवा निर्मिती चालू असेल तर अतिरिक्त सुरक्षतेची आवश्यकता लागू शकते (पूर्णता कालावधी पर्यंत).
अधिक माहिती आपणास आमच्या जवळच्या शाखेतून मिळू शकते.
|
प्र. दरवेळी मला शिल्लक तपासणे आवश्यक असल्यास मी शाखेत येणे आवश्यक आहे?
|
|
उ. नाही, आपण आमच्या शाखेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करून आपले शिल्लक तपासू शकता.
|
प्र. माझे आधीच धन्वंतरी पतसंस्थेमध्ये कार्यरत कर्ज आहे, मी वैयक्तिक / इतर कर्जासाठी पात्र आहे का?
|
|
उ. होय, सध्याच्या कर्जाच्या परतफेडीच्या रेकॉर्ड अधीन. आम्हाला आपल्या परतफेड क्षमतेचे एक मूल्यांकन करणे तसेच आपण कायद्यातील तरतुदी पूर्ण केल्या आहेत का,
अतिरिक्त सुरक्षितता गरजेची आहे का हे तपासणे आवश्यक आहे.
|
प्र. मला आपल्या इतर शाखांचे पत्ते आणि संपर्क नं. कसे मिळवता येईल ?
|
|
उ. शाखा या पर्यायावर क्लिक करा. आपणास सर्व शाखांची माहिती मिळू शकेल. अथवा रस्ते, जवळचे ठिकाण याबाबत माहिती हवी असेल तर आपण गुगल मॅप चा वापर करू शकता.
|