इतिहास
सुरूवात

समाजात अर्थकारणाच्या गरजांची पूर्ती करण्याच्या हेतूने वैद्यकीय व्यावसायिकांनी एकत्र येउन सन १९८९ पासून ते आज पर्यंत उत्तमरीत्या चालवलेली पतसंस्था म्हणजेच धन्वंतरी पतसंस्था होय. डॉ. रवींद्र भोसले, डॉ.क.श्री.लाहोटी आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी स्थापन केलेली हि पतसंस्था सातत्याने प्रगती करत असून स्थापणे पासून दरवर्षी सर्वोच्च ऑडीट वर्ग अ मिळवत आहे. या संस्थेची सुरुवात संस्थापक डॉ.रवींद्र भोसले यांचे पवित्र वास्तूत झाली. प्रथम २५२ सभासदांचे कडून रु.६१७००.०० भांडवल गोळा करून संस्थेने आपले कामकाज सुरु केले. आज संस्थेने सहकार क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा कायम केला आहे. सहकारातील नियम व अटीच्या अधीन राहून उत्तमरीत्या सहकाराचा विचार सभासदांच्या व संस्थेच्या हितासाठी वापरण्याचे सांघिक कार्य कसे करावे याचे धन्वंतरी पतसंस्था एक उत्तम उदाहरण आहे.

प्रगती
स्थापने पासून संस्थेने सभासदांना १०% पेक्षा अधिक लाभांश दिला आहे.काळाच्या बरोबर परिवर्तन करत संस्थेने सन १९९३-९४ वर्षापासून आपले काम संगणीकृत केले.तसेच भविष्यातील गरजा पूर्ण करता याव्यात याकरिता ९३ शनिवार पेठ सातारा येथे ७२०० स्क्वे.फुट. प्लॉट व ३४०० स्क्वे. फुट आर.सी.सी. बांधकाम असलेली जागा सन १९९६ मध्ये खरेदी केली. सन १९९९ साली दशकपूर्तीनिमित्त १४०० स्क्वे.फुट. चे धन्वंतरी सभागृह बांधण्यात आले. सभासदांनी टाकलेला प्रचंड विश्वास सार्थ करत सन २००० पासून कोरेगाव व फलटण तसेच सन २००२ साली कराड येथे सभासदांच्या सोयीसाठी नवीन शाखा स्वतःच्या वास्तूत कार्यरत केल्या. तसेच सन ०६-०७ मध्ये ग्लोबल सिटी पुणे येथे धनकवडी व पिंपरीचिंचवड या ठिकाणी नवीन शाखा सुरु करून त्याही आपल्या स्वतःच्या वास्तूत कार्यरत आहे.म्हणजेच मुख्य कार्यालयासह सर्व शाखा स्वमालकीच्या वास्तूत कार्यरत आहे.ही अभिमानाची व संस्थेच्या दृष्टीने उत्तमसक्षमतेची गोष्ट आहे.
बँकेपेक्षा अधिक

संस्थेने आर्थिक स्थिती भक्कम करत सभासदांच्या शारीरिक, व मानसिक विकासासाठी बॅडमिंटन,टेबल टेनिस, बुद्धिबळ,कॅरम खेळाची सोय केली.तसेच प्रत्येक सभासदांचा रु.एक लाखाचा अपघाती विमा, मोफत वाचनालय, संस्थेची वेबसाईट इ. गोष्टी सुरु केल्या. वसुलीच्या भक्कम पायामुळेच आजमितीस सुरुवातीपासून प्रत्येक वर्षी वसुलीचे प्रमाण ९८% चे पुढे आहे.