गृह कर्ज
हेतू
  • नवीन फ्लॅट खरेदीसाठी आणि घर बांधणी साठी किंवा जूने फ्लॅट / घर खरेदीसाठी
  • निवासी मालमात्तेच्या दुरूस्ती / सुधारणा / विस्तारासाठी.
पात्रता
  • 18 वर्षांच्या वरील भारतीय नागरिक.
  • आपण वैयक्तिकरीत्या किंवा कुटुंबातील अन्य व्यक्ती जसे वडील, आई, मुलगा आणि पती / पत्नी, ज्यांचे नियमित उत्पन्न स्रोत आहेत त्यांना सह अर्जदार बनवून एकत्र कर्ज मिळवू शकता.
  • अधिक तपशिलासाठी आमच्या जवळच्या शाखेत संपर्क साधा.
कमाल रक्कम
  • रु.६० लाख पर्यंत.
परतफेड
  • १८० हप्ते पर्यंत [ कमाल ]
  • परतफेडीच्या परिवर्तनशील पद्धती उपलब्ध.
व्याजदर
व्याज ८.७५ % दरसाल , कर्जाच्या कमी होणाऱ्या कर्ज रक्कमेच्या आधारावर मोजला जाईल.
हमी / सुरक्षितता
जर खरेदीसाठी प्रस्तावित घर / फ्लॅट ची निर्मिती होण्याचे बाकी असेल अथवा निर्मिती चालू असेल तर अतिरिक्त सुरक्षतेची आवश्यकता लागू शकते (पूर्णता कालावधी पर्यंत)
विमा
मालमत्तेचा विमा मालमत्तेच्या मूल्यांकनासाठी अनिवार्य आहे.
गृह कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
  • कर्ज मागणी अर्ज.
  • दोन जामीनदार(अटीस अधीन राहून).
  • कलर फोटो, राहत्या घराचा पुरावा (पासपोर्ट, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल,आधार कार्ड इ.)
  • संचालक शिफारस.
  • नोंदणी प्रमाणपत्र/ व्यवसायाचा पुरावा/ व्यवसायाचा दाखला
  • मागील तीन वर्षाची आर्थिक पत्रे / पगार दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला/ सरल फॉर्म/ फॉर्म१६.
  • मूळ खरेदीखत (विक्री करार / विक्री मान्यता ).
  • मंजूर योजना, ७/१२ उतारा, ८-अ उतारा , शहर सर्वेक्षण निर्देशांक २ (एक महिन्याच्या आतील).
  • एन.ए. ऑर्डर / मंजूर योजना/ मंजूर नकाशा/ मंजूर इमारत योजना बांधकाम परवाना
  • बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला.
  • मुल्यांकन शुल्क, सी.ए.शुल्क, कायदेशीर सल्लागार शुल्क (अटी व नियमाप्रमाणे)
  • फ्लॅटचा करार.
  • डीड ऑफ डीक्लेरेशन ची प्रत.
  • बिल्डर व सोसायटीचा ना हरकत दाखला.
  • रजी.गहाणखत ,इंडेक्स २,बोजा नोंदी उतारा.
जामीनदारासाठी आवश्यक कागदपत्रे
  • कलर फोटो, राहत्या घराचा पुरावा (पासपोर्ट, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल,आधार कार्ड इ.)
  • मागील तीन वर्षाची आर्थिक पत्रे / पगार दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला/सरल फॉर्म/ फॉर्म१६.
  • मालमत्ता कार्ड, ७/१२ उतारा