सामाजिक बांधिलकी
धन्वंतरी पतसंस्थेने सहकार क्षेत्राबरोबरच समाजामध्ये देखील आपले स्थान निर्माण केले आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, तसेच विचार आणि भावनांची देवाण घेवाण होण्यासाठी धन्वंतरी पतसंस्थेमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी गणेश उत्सव, दीपावली यासारखे सन दरवर्षी साजरे केले जातात. तसेच पल्स पोलिओ निर्मुलन यासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये देखील धन्वंतरी पतसंस्थेचा सहभाग असतो.त्यापैकी काही सामाजिक कार्ये पुढील प्रमाणे.
रक्तदान शिबीर
धन्वंतरी पतसंस्थेमार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले. सर्व कर्मचारी वर्ग तसेच अनेक लोकांनी या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले.
डॉक्टरांसाठी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजन
डॉक्टरांसाठी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजन धन्वंतरी पतसंस्थेमार्फत केले गेले. विविध भागांमधील अनेक डॉक्टरांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.
इतर सामाजिक कार्ये
  • अपंग व मतीमंद मुलाच्या निवासासाठी आर्थिक मदत.
  • सुनामी आपतग्रस्तांना रु. २५००० ची आर्थिक मदत.
  • मुला / मुलीचे निरक्षण गृह रिमांड होम येथे इनव्हर्टर बसवण्यासाठी आर्थिक मदत.
  • छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस मधील गरीब विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप.
  • सभासदांच्या शारीरिक / मानसिक आरोग्यासाठी योगासन वर्ग.