मालमत्ता कर्ज
हेतू

    आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक छोटे खर्च टाळू शकत नाही.त्यामध्ये आपल्या विविध गरजा जसे,लग्न, शिक्षण, वैद्यकीय, आपत्कालीन परिस्थिती, व्यवसाय, टुर्स आणि ट्रॅव्हल किंवा इतर कोणत्याही गरजा समाविष्ट असतात.अशा गरजांची पूर्तता करण्यासाठी धन्वंतरी मालमत्ता कर्ज हा सर्वोत्तम उपाय आहे.

पात्रता
  • बिगर शेती (रहिवासी / व्यापारविषयक) मालमत्तेचे मालकी असलेले 18 वर्षे वरील भारतीय नागरिक.
  • पगारदार व्यक्ती.
  • शेतकरी/शेतीविषयक व्यावसायिक इ.चे आर्थिक पत्र नसल्यास संबंधित प्राधिकरणाकडून उत्पन्न प्रमाणपत्र स्वीकारले जाऊ शकते.
  • आपण वैयक्तिकरीत्या किंवा कुटुंबातील अन्य व्यक्ती जसे वडील, आई, मुलगा आणि पती / पत्नी, ज्यांचे नियमित उत्पन्न स्रोत आहेत त्यांना सह अर्जदार बनवून एकत्र कर्ज मिळवू शकता.
  • अधिक तपशिलासाठी आमच्या जवळच्या शाखेत संपर्क साधा.
कमाल रक्कम
  • रु. ६० लाख पर्यंत.
परतफेड
  • 120 हप्ते पर्यंत [ कमाल ]
  • परतफेडीच्या परिवर्तनशील पद्धती उपलब्ध
व्याजदर
व्याज ११ % दरसाल आणि १० % ( डॉक्टरांसाठी ) दरसाल, कर्जाच्या कमी होणाऱ्या कर्ज रक्कमेच्या आधारावर मोजला जाईल.
हमी / सुरक्षितता
  • सुरक्षितता म्हणून आपणास आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करावी लागेल. कृपया मालमत्ता कर्जासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांचा भाग पहा.
  • तिसऱ्या पक्षकाराची हमी अनिवार्य नाही.
विमा
  • मालमत्तेचा विमा मालमत्तेच्या मूल्यांकनासाठी अनिवार्य आहे.
मालमत्ता कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
  • कर्ज मागणी अर्ज
  • दोन जामीनदार(अटीस अधीन राहून)
  • कलर फोटो, राहत्या घराचा पुरावा (पासपोर्ट, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल,आधार कार्ड इ.)
  • संचालक शिफारस
  • नोंदणी प्रमाणपत्र/ व्यवसायाचा पुरावा/ व्यवसायाचा दाखला
  • मागील तीन वर्षाची आर्थिक पत्रे / पगार दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला/सरल फॉर्म/ फॉर्म१६
  • मूळ खरेदीखत(विक्री करार / विक्री मान्यता )
  • मंजूर योजना, ७/१२ उतारा, ८-अ उतारा , शहर सर्वेक्षण निर्देशांक २ (एक महिन्याच्या आतील)
  • एन.ए. ऑर्डर / मंजूर योजना/ मंजूर नकाशा/ मंजूर इमारत योजना बांधकाम परवाना
  • बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला
  • मुल्यांकन शुल्क, सी.ए.शुल्क, कायदेशीर सल्लागार शुल्क (अटी व नियमाप्रमाणे)
  • फ्लॅटचा करार
  • डीड ऑफ डीक्लेरेशन ची प्रत
  • बिल्डर व सोसायटीचा ना हरकत दाखला
  • रजी.गहाणखत ,इंडेक्स २,बोजा नोंदी उतारा
जामीनदारासाठी आवश्यक कागदपत्रे
  • कलर फोटो, राहत्या घराचा पुरावा (पासपोर्ट, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल, आधार कार्ड इ.)
  • मागील तीन वर्षाची आर्थिक पत्रे / पगार दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला/सरल फॉर्म/ फॉर्म१६
  • मालमत्ता कार्ड, ७/१२ उतारा