बचत खाते
|
|
पात्रता
|
- अ वर्ग किंवा ब वर्ग सभासदत्व आवश्यक.
- कोणतीही राहिवाशी व्यक्ती – एक खाते.
- संयुक्त खात्यातील दोन अथवा जास्त व्यक्ती (कमाल ४ व्यक्ती ***)
- निरक्षर व्यक्ती
- दृष्टीदोष व्यक्ती
- अल्पवयीन
- संघ, मंडळ, विश्वस्त, संस्था, एजन्सी,भागीदारीतील व्यवसाय संघटना,खाजगी मर्यादित कंपनी,मालकी व्यवसाय कंपनी.
|
वैशिष्ट्य
|
- ठेवीदारांना ठेवीसाठी सर्वात सोपा पर्याय उपलब्ध.
- तरुण पिढीसाठी बँकिंगचा आणि बचतीचा आदर्श पर्याय.
- वापरण्यासाठी अगदी सोपे. समजून घेण्यसाठी अटी व नियम बचत खात्याच्या छापील नमुन्यामध्ये स्पष्टपणे व्यक्त केल्या आहेत.
- कोणतेही छुपे शुल्क नाही.
- नामनिर्देशनाची तरतूद उपलब्ध.
|
खाते उघडण्यासाठी प्रारंभिक ठेव आणि
खात्यामध्ये किमान आवश्यक रक्कम : रु.२०० /-
|
व्याजदर
|
व्याज ४ % दरसाल, मासिक उत्पादन पद्धतीने मोजला जातो
आणि वर्षातून दोनदा , मार्च आणि सप्टेंबर मध्ये जमा केला जातो .
|
पासबुक
|
प्रत्येक बचत खात्याच्या ठेवीदाराला त्याचे बचत खाते क्रमांक, त्याचे/तिचे नाव व पत्ता आणि तारखेपर्यंतचे व्यवहार,
शिल्लक रक्कम इत्यादींचा तपशील असलेले पासबुक दिले जाईल.
|
खाते चालू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
|
- दोन नवीनतम कलर फोटो.
- राहत्या घराचा पुरावा (पासपोर्ट, चालक परवाना, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल, आधार कार्ड इ.)
- ओळख पत्र.
- पतसंस्थेला माहित असलेली आणि स्वीकार्य असलेल्या व्यक्तीकडून परिचय.
- पॅन कार्ड नम्बर व पडताळणीसाठी मूळ पॅन कार्ड आवश्यक.
- प्रारंभिक ठेव रोख
|