|
धन्वंतरी सभासदांसाठी मोफत वाचनालय सुविधा पुरवते. वाचनालय धन्वंतरीच्या मुख्य कार्यालयामध्ये स्थित आहे.हे धन्वंतरीच्या उत्तम विभागांपैकी एक आहे. यामध्ये अत्यंत
जुनी पुस्तके, प्रसिद्ध कादंबरी, कला व संगीत विषयी पुस्तके, इ. मोठा संग्रह आहे. वाचनालयाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
धन्वंतरी वाचनालयामध्ये विविध भाषांमधील अनेक पुस्तके आणि कादंबरी समाविष्ट आहेत. अनेक प्रसिद्ध मराठी कादंबरी देखील वाचनालयामध्ये उपलब्ध आहेत. मराठी
संग्रहामध्ये पु.ल.देशपांडे, व्ही.पी.काळे, शिवाजी सावंत, आनंद हर्डीकर आणि बऱ्याच महान लेखकांच्या कादंबरी उपलब्ध आहेत. अशा कादंबरी आणि पुस्तकांची
उपलब्धता असल्यामुळे लोकांकडून नेहमीच वाचनालय विभागाची प्रशंसा केली जाते.
|